राष्ट्रपतीपदाचे जातीय रंग!!!

आजच (२५/०६/२०१७) शोभा डेंचा Times of India मधला column वाचला. एरव्ही नको त्या गोष्टींचा उपहास करणाऱ्या डेंचा sensible लेख वाचून बरंच बरं वाटलं. ऑलिम्पिकच्या वेळी भारतीय खेळाडूंबद्दल वाटेल ते उद्गार काढणाऱ्या ह्यांनी आज राष्ट्रपती पदाबाबत लिहिलेला लेख सद्सद्विवेकी बुध्दीला पटला हेच आश्चर्य!! असो पण मुद्दा असा की मांडलेला मुद्दा अतिशय सुसंगत आणि आजच्या परिस्थितीस धरून आहे यात शंका नाही.

राष्ट्रपती म्हणजे देशाचा चेहरा?! ही व्यक्ती कशी असावी ह्याबाबत अनेक लोकांची अनेक मत आहेत. आणि भारतात नेहमीप्रमाणे काही गोष्ट घडायच्या मार्गावर असली की चर्चेला उधाण येतं. आणि तेच ह्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण अनुभवत आहोत. अमृततुल्य,चहाच्या टपऱ्या, गावातले पिंपळाचे पार इथपासून ते अगदी चकचकीत काचांच्या कॉर्पोरेट ऑफिससच्या डेस्कपासून कॅन्टीनपर्यंत हा विषय चघळला जाऊ लागला. आपलंच मत निर्णायक असणार आहे ह्या अविर्भावात लोक नको तेवढ्या अधिकारवाणीनी बोलू लागले. भाजपाने मित्र पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चर्चा करण्यासाठी (खरोखरच कितपत ते माहित नाही) तीन सदस्यांची समिती सगळीकडे पाठवली. शेवटी मोदींनी नेहमीप्रमाणे धक्का द्यायचा तो दिलाच आणि आधी फार कोणालाच माहित नसलेले रामनाथ कोविंद रातोरात एखादा कलाकार “star” व्हावा तसे लोकांना माहित झाले. पण त्यानंतर जी चर्चा झाली त्या विषयी ह्या ब्लॉग मध्ये थोडा बोलूया…

मुळात रामनाथ कोविंद हे सध्याचे बिहारचे राज्यपाल, एक उत्तम वकील आणि दीर्घकाळ संसद सदस्य आहेत हे लोकांना कळल असेल की नाही ह्यात शंकाच आहे. पण वृत्तवाहिन्यांवरून कळलेल्या ह्या ओळखीपेक्षा आपल्या देशात ज्याला अवास्तव महत्व दिलं जातं त्या जातीविषयीच चर्चा सुरु झाली! मग काय! ही व्यक्ती कशी आहे त्या पेक्षा हि व्यक्ती जातीने कोण आहे हेच सांगितले जाऊ लागले. जो माणूस एका महिन्यात देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणार आहे ( आताचे NDA ला समर्थन बघता ह्याला कोणाचे दुमत असण्याचे काही कारण नाही!) त्याच्याबद्दल अशी ही चर्चा म्हणजे लोकांच्या करंटेपणाचेच लक्षण म्हणावे लागेल.बिहार सारख्या एका संवेदनशील राज्याच्या राज्यपालपदी असताना देखील जो माणूस कोणत्याही आक्षेपार्ह अश्या वादात न पडता आपले काम चोख बजावत आहे अश्या माणसाच्या कर्तृत्वाविषयी न बोलता त्याचे “दलित”पण काढले “जात” आहे.

हीच चूक(?) लोकांनीच नाही पण कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष करताना दिसतायत. NDA ने दलित चेहरा दिला म्हणूनच मीरा कुमारांच नाव पुढे आल हे कोणीच नाकारू शकत नाही. असो. मुद्दा असा की राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा पाहता यात जातीचे राजकारण करणे कितपत योग्य आहे हे प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेकाने ठरवायला हवं. मीरा कुमार या निवृत्त IFS ऑफिसर आहेत आणि लोकसभेच्या माजी सभापती. त्यांची ही कारकीर्द पाहता त्यापण या पदासाठी तितक्याच सक्षम उमेदवार आहेत ह्यात कोणाच्याच मनात किंतु नसावा. पण शेवटी ही निवडणूक कर्तुत्व किवा संख्याबळावर न लढवता ह्याला जातीवादाचा रंग अनेक स्तरातून दिला जात आहे.

ह्या लोकशाही देशात आणि आपल्या “so called” सेक्युलर अश्या भारतवर्षात एवढी मोठी निवडणूक सुद्धा आपण जातीयवादाने रंगवतो आहे ह्याचा खेद आपल्या सगळ्यांनाच असायला पाहिजे. शेवटी राष्ट्रपती हा जातीचा नाही तर भारताचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जाणार आहे. ह्या पदासाठी जाहीर झालेल्या उमेदवारांचा विचार करताना त्याचे समाजातील स्थान, प्रतिष्ठा , त्याचे विचार, भारतीय समाजाकडे बघायचा दृष्टीकोन आणि देशासाठी त्याने केलेले योगदान ह्याचा विचार केला गेला पाहिजे.

शेवटी राजकारण प्रत्येक ठिकाणी आलंच पण ते खेळताना (विशेषतः vote bank politics)  किंवा त्या खेळीचं विश्लेषण करताना आपण आपल्याच देशच्या प्रतिमेला धक्का पोचवत नाही आहोत ना ह्याचा विचार झालाच पाहिजे !!!

-Shreyas Godbole  & Anup Shaha

©Polinomist

 

Advertisements

2 thoughts on “राष्ट्रपतीपदाचे जातीय रंग!!!

Add yours

  1. Well written… Marathit lihilya mule reach jast vadhel… karan apn jyanna pathvto te mostly marathi vachna prefer kartat

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: